गुहागर येथील लिटिल फ्लॉवर प्री स्कूल यांचा अनोखा उपक्रम… 

इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन 

मोडकाआगर l वार्ताहर : कला आरंभ आणि लिटिल फ्लॉवर प्री स्कूल गुहागर यांच्या माध्यमातून. गुहागर येथील ज्ञान रश्मी वाचनालय येथे इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.लिटिल फ्लॉवर प्री स्कूल हे गुहागर येथे असून, त्या स्कूलच्या माध्यमातून लहान मुलांसाठी इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारणे याची एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.या इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेतून प्रथम क्रमांक कु.सान्वी शैलेंद्र खातू, द्वितीय क्रमांक कु.गोजिरी अप्पाराव मुळे, तृतीय क्रमांक कु.हृदयेश प्रशांत साटले यांनी प्राप्त केला. त्यांना सन्मानित करण्यात आले.कार्यशाळेसाठी चांगल्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. शिक्षणाबरोबर कलेला अधिक प्राधान्य दिले पाहिजे, याच दृष्टिकोनातून गेल्यावर्षी देखील लिटिल फ्लॉवर प्री स्कूलनी वारली पेंटिंग काढणे या कार्यशाळेचे आयोजन केले होते.एकंदरीत पालकांकडून देखील लिटिल फ्लॉवर प्री स्कूलच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले.लिटिल फ्लॉवर प्री स्कूलच्या ओनर सोनाक्षी प्रशांत साटले ( पल्लवी हरीष सकपाळ ) आणि त्यांचे पती प्रशांत पंढरीनाथ साटले

यांनी उपस्थित सर्व पालकांचे आभार मानले आहेत.

आणि भविष्यात देखील आमच्या स्कूल कडून चांगले उपक्रम राबवले जातील असे आश्वासन दिले.