शिवसेनेच्या कणकवली तालुकाप्रमुख पदी दामू सावंत, तर ग्रामीण तालुकाप्रमुख पदी मंगेश गुरव

देवगड तालुका प्रमुख पदी विलास साळस्कर व अमोल लोके

वैभववाडी तालुकाप्रमुख संभाजी रावराणे,कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल

महिला उपजिल्हा प्रमुख पदी सरिता राऊत देवगड महिला तालुका प्रमुख निता गुरव यांची नियुक्ती

आमदार निलेश राणे यांनी केले पत्रकार परिषदेत घोषणा

कणकवली;
कणकवली विधानसभा मतदारसंघातील कणकवली देवगड आणि वैभववाडी या तिन्ही तालुक्यांसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख आज आमदार निलेश राणे यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे महिला उपजिल्हाप्रमुखांच्याही घोषणा करण्यात आल्या. आमदार निलेश राणे म्हणाले , संघटनात्मक बांधणी करण्यासाठी पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात येत आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कणकवली तालुकाप्रमुख दामोदर उर्फ दामू सावंत , खारेपाटण ग्रामीण साठी तालुका प्रमुख मंगेश गुरव , देवगड तालुकाप्रमुख विलास साळस्कर, देवगड ग्रामीण साठी तालुका प्रमुख अमोल लोके (मिठबाव ), वैभववाडी तालुकाप्रमुख संभाजी रावराणे , कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल आदी पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत . महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सरिता राऊत कणकवली निता गुरव देवगड महिला तालुका प्रमुख ,यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. लवकरच या तीनही तालुक्यांमध्ये पदाधिका-यांच्या कार्यकारिणी नियुक्त्या केल्या जातील. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकांपूर्वी मजबूत संघटना उभी केली जाईल असा विश्वास, आ. निलेश राणे यांनी व्यक्त केला. या नियुक्तीवेळी उपनेते संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते,कुडाळ तालुका प्रमुख दादा साहिल, फोंडाघाट सरपंच सौ. संजना आंग्रे, यांच्यासह असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.