सुमारे एक लाख एक हजार सातशे रुपयांचे नुकसान
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यात दोन ठिकाणी घरांवर झाड पडल्याने आणि एका ठिकाणी घराच्या भिंतीवर संरक्षक भिंत कोसळल्याने तिघांचे मिळून सुमारे एक लाख एक हजार सातशे रुपयांचे नुकसान झाले आहे अशी माहिती वेंगुर्ले तहसील कार्यालयातील आपत्ती निवारण विभागाकडून देण्यात आली.
सिद्धेश्वरवाडी येथील सुजाता महादेव कापडोसकर आणि वl वेंगुर्ला सुकटनवाडी येथील देवदत्त जुुवलेकर यांच्या घरावर झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. तर श्रीरामवाडी येथील अनय मेथर यांच्या घराच्या भिंतीवर संरक्षक भिंत कोसळल्याने नुकसान झाले आहे. तिघांची मिळून एकूण नुकसानी एक लाख एक हजार सातशे रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान पावसाचा जोर कायम असून कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच समुद्रात मासेमारीसाठी मच्छीमारानी जाऊ नये असे आवाहन तहसीलदार यांच्याकडून करण्यात आले आहे.













