शिरगाव (प्रतिनिधी) – सांडवे हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या देवगड तालुकास्तरीय तायक्वाँदो स्पर्धेत येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
१४ वर्षाखालील गटात मुलांमध्ये २७ ते २९ या वजनी गटात प्रणव परब द्वितीय, ३२ ते ३५ या वजनी गटात श्लोक सावंत द्वितीय, तर ३५ ते ३८ या वजनी गटात प्रणय खरात प्रथम आला. मुलींमध्ये ३८ ते ४१ या वजनी गटात जान्हवी सावंत द्वितीय ठरली.
१७ वर्षाखालील गटात मुलांमध्ये ४१ ते ४५ या वजनी गटात तेजस गोलतकर प्रथम व अथर्व परब द्वितीय, तर ४५ ते ४८ या वजनी गटात सचिन यमगर प्रथम व खुशाल मसूरकर द्वितीय आले. मुलींमध्ये ३५ ते ३८ या वजनी गटात श्रावणी घाडीगावकर प्रथम, ४४ ते ४६ या वजनी गटात निकिता येरम प्रथम, तर ४९ ते ५२ या वजनी गटात रश्मी धुळप प्रथम आली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.













