तवसाळ :
गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी मध्ये अनेक वर्षांपासूनची परंपरा जपत याही वर्षी दही हंडी उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला होता.
या उत्सवाला ना सेलिब्रिटी नाही DJ आपल्या पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशे यांच्या आवाजात हे वातावरण भक्तिमय तयार झालं, सध्या अनेक गावांतील चाकरमानी कामानिमित्ताने मुंबई, पुणे शहरात वास्तव्यास असल्याने ग्रामस्थ व युवा तरुणांची कमी जानवत असते. यासाठी आम्ही महिला मंडळ कायम खांद्यावर खांदा लावून सोबत असतात हे दृश्य दिसते.
उपस्थित ग्रामस्थ यांच्या वतीने परंपरागत उत्सव साजरा करत मुलांना घेऊन ३ थरांचा मनोरा रचत सलामी देत , दही हंडी फोडण्यात आली. तर संपूर्ण तांबडवाडी मधील सर्वांच्या घरांमध्ये जाऊन दही लुटलं, तर शेवटच्या टप्प्यात येत आमच्या महिला सोबतीला गोपाळकाळाचा आनंद लुटताना दिसल्या. लहान मुलांना घेऊन थर लावले, आनंदी क्षण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.











