ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावठणवाडी येथील रहिवासी आणि ओटवणे देवस्थान चे मानकरी असणाऱ्या बापू सदू गावकर वय 92 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. बापू गावकर हे गावात अण्णा मयेकर या नावाने परिचित होते गेल्या महिन्याच्या 30 तारीखला त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते त्यांच्या निधनाच्या अवघ्या 23 व्या दिवशी त्यांचे निधन झाले आधीच वयाने वयोवृद्ध अण्णा मळेकर हे पत्नीच्या निधनाने अजून खचून गेले आणि गुरुवारी रात्री 9 वाजता त्यांचे आपल्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने देवस्थान मधील जाणकर व्यक्ती हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पच्छात मुलगे, सुना जावई, पुतणे, नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. येथील बाबा गावकर( मळेकर ), राजन गावकर, चंदू गावकर, ओटवणे हायस्कूल कर्मचारी मंगेश गावकर यांचे ते वडील तर पत्रकार सिताराम गावडे यांचे ते मावशे होय.











