चिपळूण येथे ३१ रोजी रिपब्लिकन सेनेचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा 

सरसेनानी आनंदराज आंबेडकर करणार मार्गदर्शन

चिपळूण | संतोष कुळे  : रिपब्लिकन सेनेचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवार ३१ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन प्रांत ऑफिस शेजारी चिपळूण येथेआयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सरसेनानी आनंदराजी आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत.

रिपब्लिकन सेनेची घौडदौड संपूर्ण महाराष्ट्र भर सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ही रिपब्लिकन सेनेचे काम गेली अनेक वर्ष सुरू आहे. सर्व बहुजनांना एकत्रित घेऊन रिपब्लिकन सेना काम करीत आहे. या सर्व कार्यकर्त्यांना नियोजन बद्ध काम कसे करावे आणि संघटन विषयक मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः पक्षाचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यकर्ता मेळावा पक्षाच्या वाटचालीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.  या कार्यकर्ता मेळाव्याला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संदेश मोहिते, संदीप पवार, चंद्रसेन मोहिते, केतन मोहिते, प्रकाश पवार रत्नागिरी, सचिन जाधव संगमेश्वर, सुरज मोहिते खेड, समीर गायकवाड, विलास पवार, प्रमोद मोहिते, विलास मोहिते, जितेंद्र जाधव, अभिषेक प्रसाद, प्रदीप जाधव, मंदार मोहिते, महेंद्र मोहिते गुहागर, विश्वास मोहिते गुहागर प्रवीण पवार शशिकांत मोहिते यांनी केले आहे.