वि.स. खांडेकर विद्यालयात वह्या वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी, सावंतवाडी शहर मंडळातर्फे वि.स. खांडेकर विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. याचवेळी विद्यालयातील विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये निवड झालेल्या गुणवंत खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला.

या कार्यक्रमात १७ वर्षांखालील विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झालेली जान्हवी दीपक जाधव आणि जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत निवड झालेला आदर्श पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला.

या प्रसंगी सावंतवाडी भाजप शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजू शिरोडकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्या आणि माजी नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाळेच्या वतीने मुख्याध्यापक राजाराम पवार यांच्यासह शिक्षक सतीश धुमाळे, श्रीशैल परीट, सुरेश कोळी, सौ. सारिका शृंगारे आणि सौ. मयुरी इन्सुलकर उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून, गुणवंत खेळाडूंच्या यशाचे कौतुक करण्यात आले.