२१ ऑक्टोबरपासून साप्ताहिक विशेष गाड्या; सावंतवाडी रोडसह कोकणातील स्थानकांवर थांबा
२० एलएचबी डबे; २१ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान विशेष सेवा
देवगड : प्रतिनिधी
पूजा व दिवाळीच्या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने तिरुवनंतपुरम सेंट्रल–मदार जंक्शनदरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांना सावंतवाडी रोड स्थानकासह कोकणातील विविध स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
गाडी क्रमांक ०६०१३ तिरुवनंतपुरम सेंट्रल–मदार जंक्शन साप्ताहिक विशेष तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून बुधवार, २१ ऑक्टोबर, २८ ऑक्टोबर, ४ नोव्हेंबर, ११ नोव्हेंबर, १८ नोव्हेंबर आणि २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.४५ वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता मदार जंक्शन येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०६०१४ मदार जंक्शन–तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष मदार जंक्शन येथून शनिवार, २४ ऑक्टोबर, ३१ ऑक्टोबर, ७ नोव्हेंबर, १४ नोव्हेंबर, २१ नोव्हेंबर आणि २८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९.४० वाजता सुटेल. ही गाडी चौथ्या दिवशी रात्री १२.४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे पोहोचेल.
या विशेष रेल्वेला कोल्लम जंक्शन, कायनकुलम, मावेलिकारा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, चंगनाशेरी, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, अलुवा, त्रिशूर, शोरनूर जंक्शन, तिरूर, कोझिकोड, कन्नूर, कासारगोड, मंगळुरू जंक्शन, सुरथकल, उडुपी, कुंदापुरा, मूकांबिका रोड बायंदूर, मुर्डेश्वर, कुंता, कारवार, मडगाव जंक्शन, थिवीम, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा जंक्शन, गोध्रा जंक्शन, रतलाम जंक्शन, मंदसौर, नीमच, चित्तौडगड जंक्शन, भीलवाडा, बिजयनगर आणि अजमेर जंक्शन आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
या विशेष रेल्वेला एकूण २० एलएचबी डबे असतील. त्यामध्ये २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, १ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ४ वातानुकूलित तृतीय श्रेणी इकॉनॉमी, १३ स्लीपर डबे आणि २ जनरेटर कारचा समावेश आहे.
प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. विशेष गाडीचे सविस्तर थांबे व वेळापत्रक भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.










