रत्नागिरी :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्र. 22229/22230) मध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.
सध्या ही गाडी ८ डब्यांच्या रचनेत धावते. मात्र गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना अधिक सोय व्हावी म्हणून ही रचना १६ डब्यांची करण्यात आली आहे.
गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
-
गाडी क्र. 22229 मुंबई CSMT वरून 25, 27 आणि 29 ऑगस्ट 2025 रोजी सुटेल.
-
गाडी क्र. 22230 मडगाव येथून 26, 28 आणि 30 ऑगस्ट 2025 रोजी सुटेल.
प्रवाशांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.












