मसुरे | झुंजार पेडणेकर
मालवण तालुक्यातील गोळवण-धनगरवाडीतील ग्रामस्थांना गेली अनेक वर्षे गणेश विसर्जन तळीची समस्या भेडसावत होती. येथील धनगर समाजबांधवांनी वेळोवेळी ग्रामपंचायत गोळवण यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. परंतु, ती अद्याप पूर्ण झाली नव्हती. अखेर यावर्षी गोळवण सरपंच सुभाष लाड व त्यांचे सहकारी यांनी ही समस्या मार्गी लावण्यासाठी निधी मंजूर करून या तळीच्या कामाचा शुभारंभ तथा भूमिपुजन नुकतेच माजी सरपंच आबा परब यांच्या हस्ते केले.
यावेळी सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, आप्पा घाडी, चंद्रकांत चव्हाण, ब्रबन वरक, इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. गणेश गोळवण-धनगरवाडीसाठी विसर्जन तळीचे काम ग्रामपंचायतीने मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.














