रत्नागिरी/वार्ताहर :
लांजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू अंतर्गत उपकेंद्र पुनस व ग्रामपंचायत पुनस यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच श्री. संतोष लिंगायत यांनी भूषवले.

सदर कार्यक्रम डॉ. महेंद्र गावडे (जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी), डॉ. प्रशांतकुमार परगे (तालुका आरोग्य अधिकारी, लांजा), डॉ. विवेक कामत (प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू), डॉ. शिवराज नवले (प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमास श्री. संतोष साळवी (प्रतिष्ठीत नागरिक), श्री. प्रभोध कीर (ग्रामपंचायत अधिकारी पुनस), श्री. प्रमोद गुरव व सौ. रश्मी सावंत (ग्रामपंचायत सदस्य) उपस्थित होते.
यावेळी श्री. मंगेश पाटील (आरोग्य सहाय्यक, जिल्हा क्षयरोग विभाग), श्री. निलेश हंगे (एक्स-रे टेक्निशियन), श्री. दिलीप वि. गुरव (आरोग्य निरीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू), श्री. शैलेश रेवाळे (आरोग्य सहाय्यक), श्रीम. स्नेहल झगडे (आरोग्य सहाय्यिका, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू) यांची विशेष उपस्थिती होती.
शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री. सुधीर भाऊ लिंगायत (MPW), प्रिती कांबळे (ANM), श्री. शुभम कांबळे (MPW), श्री. सुरज सोळंके (MPW), श्रीम. क्षितिजा लोखंडे व श्रीम. प्रणाली गोरे यांनी रुग्णांची अत्याधुनिक तपासणी केली. तसेच सर्व आशा ताई, पोस्टमन व अंगणवाडी सेविकांनीही या मोहिमेत परिश्रम घेतले.
समता फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या माध्यमातून डॉ. उगवेकर व श्री. नितिश शेट्ये यांनी डोळे व मोतीबिंदू तपासणी करून ग्रामस्थांना मोफत चष्म्यांचे वाटप केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू कार्यक्षेत्रातील हर्चे, आगवे, कोट, खानवली आदी ग्रामपंचायतींमध्ये यापूर्वीच क्षयरोग मुक्त भारत अभियान शिबिरे यशस्वीरित्या पार पडली आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींमध्येही लवकरच शिबिरे आयोजित करण्याचा मानस असल्याचे आरोग्य निरीक्षक श्री. दिलीप वि. गुरव यांनी सांगितले.













