पालघर पोलीस दलातर्फे १० व २५ कि.मी. सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन

पालघर : “फिटनेस की डोस – अर्धा घंटा रोज” या घोषवाक्याचा प्रसार करून नागरिकांमध्ये आरोग्य व फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलीस दलाकडून सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सकाळी सात वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथून या उपक्रमाची सुरुवात पोलीस अधीक्षक यतिश देशमुख,अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

या उपक्रमात दोन गट ठेवण्यात आले –

१० कि.मी. सायक्लोथॉन : पोलीस अधीक्षक कार्यालय – चाररस्ता – रेल्वे स्टेशन – माहिम वळण नाका – परत पोलीस अधीक्षक कार्यालय.
२५ कि.मी. सायक्लोथॉन : पोलीस अधीक्षक कार्यालय – चाररस्ता – माहिम रेल्वे स्टेशन – पोलीस दुरक्षेत्र – मंगलम रिसॉर्ट, माहिम – परत पोलीस अधीक्षक कार्यालय.
सायक्लोथॉनमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांसह जिल्ह्यातील तब्बल २५५ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी सहभाग घेऊन नागरिकांना प्रेरणा दिली.
सायक्लोथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागींचा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख , अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांचे मार्गदर्शन आणि पोलीस अधिकारी-अंमलदारांचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. या सायक्लोथॉनमुळे नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी व्यक्त केला .