चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाचा 58वा युवामहोत्सव नुकताच ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे येथे दि. 24 आगस्ट 2025 रोजी संपन्न झाला. या युवा महोत्सवामध्ये विविध 20 महाविद्यालयातील जवळपास 500 पेक्षा अधिक विद्यार्थी 43 प्रकारच्या विविध स्पर्धामध्ये सहभागी झाले होते.
घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी विविध स्पर्धामध्ये आपला सहभाग नोंदवून 06 पारीतोषिके प्राप्त केली. रांगोळी वैयक्तीक यामध्ये वैष्णवी शिर्के हीला व्दितीय पारीतोषिक प्राप्त झाले. शास्त्रीय वादय (स्वरवाद्य) वैयक्तिक या प्रकारामध्ये श्रावणी सकपाळ या विद्यार्थीनीला प्रथम पारीतोषिक मिळाले तर गंधर संकपाळ यांनी तृतीय पारीतोषिक पटकाविले. वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी) गट ब मधून सलोनी म्हाडलेकर हीला उत्तेजनार्थ पारीतोषिक प्राप्त झाले आहे. भारतीय शास्त्रीय नृत्य या प्रकारामध्ये मनस्वी शिरकर हीने व्दितीय पारीतोषिक संपादन केले तर भारतीय लोकनृत्य या प्रकारामध्ये पारंपारीक गुजराती गरबा या नृत्य प्रकाराला व्दितीय पारीतोषिक मिळाले. या सांघिक प्रकारामध्ये सई दळवी, सुहानी इंदुलकर, श्रुती शिर्के, निकीता नारखेडे, रुतीका पाटील, सिध्दी राजेशिर्के, मनस्वी शिरकर, श्रुतिका सावंत, वैष्णवी उगवे, रिध्दी जोशी, तर साथीदार म्हणून सोहन चव्हाण व श्रावणी संकपाळ यांचा सहभाग होता.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल प्राचार्य डा. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डा. एस. के. पाटील, रजिस्ट्रार प्रा. संदिप मुनघाटे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा. ओ.ए. जरली व सहाय्यक म्हणून प्रा. श्रध्दा गोपाळ यांनी काम पाहीले.











