उपाध्यक्ष पदी सत्यवान घाडे
गुहागर : पत्रकारितेबरोबरच गुहागर तालुक्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुहागर तालुका पत्रकार संघाची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील भंडारी भवन येथे पार पडली. यावेळी संघाची दोन वर्षांसाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष पदी दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी मनोज बावधनकर तर उपाध्यक्ष पदी तरुण भारतचे सत्यवान घाडे यांची निवड करण्यात आली.
या कार्यकारिणी मध्ये सचिव पदी निलेश गोयथळे, खजिनदार पदी संकेत गोयथळे, संचालक म्हणून गणेश धनावडे, मंदार गोयथळे, संतोष घुमे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज बावधनकर यांनी बोलताना सांगितले गुहागर तालुका पत्रकार संघ तालुक्यात दरवर्षी आदर्शवत नवनवीन उपक्रम राबवत आले आहे. सामाजिक कार्यात संघाचा सहभाग नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये पत्रकार संघाचे योगदान यापुढेही कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.