लेन्स आर्ट रत्नागिरी प्रस्तुत माऊली मनामनातली ह्या वारीचा वेध घेणाऱ्या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ आज गुरुवार दिनांक २९ जून आषाढी एकादशीची मुहूर्तावर पार पडला. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल मंदिर देवस्थानाचे अध्यक्ष श्री नानाशेठ मराठे, श्री प्रमोदशेठ रेडिज , प्रविण हेळेकर, फाटक हायस्कूलचे कलाशिक्षक दिलीप भाताडे सर, लेन्स आर्टचे सिद्धेश वैद्य, परेश राजीवले, तन्मय दाते, शिरीष तारवे आणि सुमेध तारवे उपस्थित होते.
सकाळी १० वाजता मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. आषाढी एकादशीचे भक्तिमय आणि उत्साही वातावरणात वारीचे प्रदर्शन पाहणे म्हणजे भाविकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.. प्रदर्शन सर्वाना पाहण्यासाठी २ जुलै पर्यंत खुले आहे..
लेन्स आर्ट रत्नागिरी तर्फे रत्नागिरीकरांना प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे…