केंद्र शाळा साळशी शाळेला स्मार्ट टीव्ही भेट

शिक्षणप्रेमी कै. सूर्यकांत मिराशी यांच्या स्मरणार्थ भेट

शिरगाव, (प्रतिनिधी) –             देवगड तालुक्यातील शिक्षणप्रेमी कै. सूर्यकांत दिनकर मिराशी यांच्या स्मृतिपित्यर्थ, संध्या सूर्यकांत मिराशी व कुटुंबीयांकडून केंद्र शाळा साळशीला शालेय विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आली.

अत्यंत गरिबीतून व कष्ट करून शिक्षण घेऊन यश संपादन करणारे कै. सूर्यकांत मिराशी यांच्या शिक्षणप्रेमाची जाणीव ठेवून, आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण मिळावे, या हेतूने १७,५०० रुपयांच्या किंमतीचा स्मार्ट टीव्ही त्यांच्या कुटुंबीयांकडून शाळेला प्रदान करण्यात आला.

यावेळी त्यांच्या मुलगी शुभदा चारुदत्त भगत यांनी,माझ्या वडिलांचे गावासाठी काहीतरी उपयोगी करण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करीत आहोत. त्यांच्या शिक्षणप्रेमातून आणि आदर्शातून आम्हाला स्फूर्ती मिळाली, आणि आज ही छोटीशी भेट विद्यार्थ्यांसाठी योगदान म्हणून देत आहोत.”

शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी या उदात्त कार्याबद्दल कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानले.

सरपंच वैशाली सुतार यांनीही दातृगुणाबद्दल कौतुक व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या योगदानाचे महत्त्व सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक संजय मराठे यांनी केले, प्रस्तावना पत्रकार राजेंद्र साटम यांनी दिली तर आभार सहशिक्षक प्रकाश झाडे यांनी मानले.

यावेळी सरपंच वैशाली सुतार, संध्या मिराशी, शुभदा भगत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश गावकर, पोलीस पाटील कामिनी नाईक, मुख्याध्यापक गगाधर कदम, सहशिक्षक संतोष मराठे, प्रकाश झाडे, स्मिता कोदले, अंगणवाडी सेविका अस्मिता मेस्त्री, मदतनीस सुविधा किजवडेकर व विद्यार्थी उपस्थित होते.

 

फोटो कॅप्शन :

केंद्र शाळा साळशीला कै. सूर्यकांत दिनकर मिराशी यांच्या स्मृतिपित्यर्थ संध्या सूर्यकांत मिराशी व कुटुंबीयांकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आली.