ओटवणे (प्रतिनिधी ) वाफोली येथे सांबराची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीच मोठं नुकसान झालं तर दुचाकीस्वार युवक किरकोळ जखमी झाला.ओटवणे जाधववाडी येथिल युवक योगेश जाधव हा आपल्या दुचाकीने गोव्यावरून ओटवणे येथे येत असताना वाटेत बांदा वाफोली मार्गांत मुख्यरस्त्यावर दूचाकिला सांबर या जंगली प्राण्याची जोरदार धडक बसली यात त्याच्या एक्सेस 125 या गाडीचे मोठे नुकसान झाले.या धडकेत योगेश हा दुचाकीवरून बाजूला फेकला गेला.हेल्मेट मुळे डोक्याला मार लागला नाही. सांबराची शिंगे गाडीच्या पुढील पॅनल मध्ये अडकली त्यामुळे दिलेल्या झटक्यामुळे गाडी 10,12: फुटापर्यँत फरफटत गेली यात गाडीचे मोठे नुकसानही झाले.ही घटना मंगळवारी रात्री ८. ३० वाजताच्या सुमारास घडली योगेश हा रात्री गोवा येथून कामावरून येत होता. अचानक घडलेल्या घटनेमुळे योगेश ही घाबरून गेला मोठा आवाज झाल्यावर जवळील हॉटेल मधील माणसे धावून आली आणि पडलेल्या योगेश ला उचलून बाजूला बसविल त्याला धीर दिला व त्यानंतर घरी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यात गाडीचे नुकसान झाले.जीवावर बेतले होते मात्र थोडक्यात निभावलं.मानेला थोडी दुखापत सोडली तर मोठी दुखापत झाली नाही.वाफोली धरण परिसरात जंगली जनावरांच मुक्त संचार सध्या वाहन चालकांची डोकेदुखी ठरत आहे.
Home सिंधुदुर्ग बांदा वाफोली मार्गांवर सांबराची दुचाकीला धडक, दुचाकीचे मोठे नुकसान सुदैवाने युवक बचावला













