देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी येथे गौरी पूजनानिमित्त साडी वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गावाचे सरपंच श्री. उदय पाळेकर यांनी हा उपक्रम आयोजित करण्यात केला होता.
या कार्यक्रमात साडी वाटप देवगड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. लक्ष्मण (रवी) पाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला श्री. श्रीकांत पाळेकर, सौ. ज्योती पाळेकर व श्री. अंकुश मोंडे उपस्थित राहून सहकार्य केले. गावातील ज्या घरांमध्ये गौरी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, त्या प्रत्येक घरांमध्ये हा साडी वाटप उपक्रम राबविण्यात आला.
गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.












