संत तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध असलेला आणि निसर्गाशी आपले नाते सांगणाऱ्या या अभंगाच्या उक्तीप्रमाणे
*वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥*
वन आणि निसर्ग यासाठी जंगलातील झाडे, वेली आणि सर्व पशू-पक्षी हे आमचे सगेसोयरे आहेत आणि गोड आवाजात गाणारे पक्षी हे आमचे मित्र आहेत.
खरंतर आजच्या काळात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे फार गरजेचे आहे हे वरील प्रमाणे कित्येक वर्षापूर्वी महान संतांनी सांगितले आहे. याच धर्तीवर राष्ट्रीय सेवा योजना या विभागामार्फत आज एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस. बाडकर सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
हा कार्यक्रम जागतिक पर्यावरण दिवस याचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले तसेच एक एक व्यक्ती एक झाड हा संकल्प सुद्धा करण्यात आला याचे महत्त्व सर्वांच्या पर्यंत पोहोचवावे हा त्या पाठीमागचा उद्देश होता याप्रसंगी एस एस पी एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एस बाडकर सर, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख
डॉ.रावसाहेब ठोंबरे सर, ऐ.आय एम एल विभाग प्रमुख
प्रा. प्राजक्ता राणे मॅडम,संगणक विभाग प्रमुख प्रा.कदम सर,प्रा.मेलसगरे सर, प्रा.मालपेकर सर,प्रा.हर्णे सर,प्रा.माईनकर सर,श्री प्रभू सर ,श्री आनंद मोरजकर,श्री संतोष सावंत तसेच प्रकल्प अधिकारी प्रा.अरविंद कुडतरकर सर ,आणि महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग ,कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.












