मालवण | प्रतिनिधी : भारतीय नौदलात अग्निवीर म्हणून निवड झालेले मालवण शहरातील दांडी येथील विनायक तानाजी मानवर यांचा भाजप महिला शहराध्यक्षा अन्वेशा अजित आचरेकर व पर्यटन व्यावसायिक अजित आचरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विनायक यांनी पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण दांडी येथील प्राथमिक शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर ते सिंधुदुर्ग महाविद्यालय एन.सी.सी. कॅडेट होते. विनायक दांडी येथे वास्तव्यास आहेत.
भारतीय नौदलात रुजू होणार असल्याने यानिमित्त पर्यटन व्यावसायिक अजित आचरेकर आणि भाजपच्या शहराध्यक्षा अन्वेशा आचरेकर यांनी त्याचा सत्कार केला. त्यांनी विनायक यांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ऋग्वेद आचरेकर, सुजल केळुसकर, यतीन आचरेकर, सचिन आचरेकर, मॉरिस फर्नांडीस, बबन आचरेकर, शंकर आचरेकर आणि जनार्दन आचरेकर उपस्थित होते.













