शेर्ले ग्रामपंचायत तर्फे उभारला वनराई बंधारा 

बांदा : प्रतिनिधी

संभाव्य दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन जलसंधारण व भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांच्या श्रमदानातून शेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने ओहोळावर वनराई बंधारा उभारण्यात आला.

 

यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता प्रदिप पाटील, बांदा मंडळ कृषी अधिकारी युवराज भुईम्बर, शेर्ले सरपंच सौ. प्रांजल जाधव, माजी उपसरपंच दीपक नाईक, ग्रामपंचायत सदस्य बाळा शेर्लेकर, सचिन किनळेकर, जिज्ञासा तारी, ग्रामपंचायत अधिकारी राजन नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष जगन्नाथ धुरी, तंटामुक्ती सदस्य अनिल पिंगुळकर, लवू सावळ, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच सर्व अंगणवाडी सेविका, महिला बचत गटांच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

ग्रामपंचायत अधिकारी राजन नाईक यांनी महिला बचत गट, अंगणवाडी सेविका व समस्त ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.