जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी यांचे बांदा परिसरात गणेश दर्शन 

बांदा : प्रतिनिधी

 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी बांदा परिसरातील पदाधिकाऱ्यांच्या गणरायाचे दर्शन घेतले. श्री बांदेश्वर भूमिका देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांच्या घरी त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले.

 

तसेच गुरुनाथ सावंत, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, साई धारगळकर यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतीब, साई धारगळकर, निलेश कदम आदी उपस्थित होते.