बने कुटुंबीयांना महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण करून देण्याचे काम रेयांशने केले- डॉ.सुभाष बने

 स्केटिंग स्पर्धेतील राष्ट्रीय खेळाडू कृ.रेयांश पराग बने, तरुण उद्योजिका कृ.तेजल सुरेश बने यांचा कुंडी गाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) : बने कुटुंबीयांना महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण करून देण्याचे काम रेयांशने केले आहे, असे प्रतिपादन संगमेश्वरचे माजी आमदार डॉ.सुभाष बने यांनी केले. स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या स्केटिंग राष्ट्रीय स्तरावरील बाल खेळाडू कु. रेयांश पराग बने यांचा देवरुख कुंडी गावी भव्य सत्कार समारंभाचे रविवारी सायंकाळी आयोजिन करण्यात आले होते. यावेळी रेयांशचे आजोबा डॉ.सुभाष बने शुभेच्छा देताना बोलत होते.
नुकतेच केरळ येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करताना यश मिळविणाऱ्या कृ.रेयांश पराग बने याचा सत्कार आणि तरुण वयात महिला उद्योजिका म्हणून नावारूपास आलेल्या तेजल सुरेश बने हिच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. देवरुख येथील कुंडी मूळगावी बने कुटुंबियांच्या मानाच्या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवाचे औचित्य साधून कुंडी गावातील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आणि वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कु.रेयांशने वयाच्या पाच वर्षापासून एक छंद म्हणून स्केटिंग खेळ आत्मसात केला, पुढे त्याला या खेळात आवड निर्माण झाली. त्याने पुढील काळात सातत्य जपले आणि शालेय अभ्यास सांभाळून विविध ठिकाणच्या स्पर्धेत भाग घेऊ लागला आवड, मनातील जिद्द आणि लढण्याची ऊर्जा घेऊनच तो प्रत्येकवेळी यशोशिखर गाठत गेला बालवयात त्याने सुरवातीला क्लब स्थरावर खेळण्यास सुरुवात केली. आज स्पोर्ट्स क्लब आणि संघाच्या मार्फत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. ८ कांस्य,८ बाँन्झ,१२, सिल्वर ३३ गोल्ड सुवर्णपदक अशी एकूण ५३ पदके त्यांनी आज आपल्या वयाच्या नवव्या वर्षी मिळवली आहेत, असे मनोगत व्यक्त करतांना डॉ.सुभाष बने म्हणाले. मोठे आबा, छोटे आबा,लहान आजी,बारक्या आबा, नाना आबा, नानी आजी, रोहन काका ,समीक्षा काकी या सर्वांचे नेहमी प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला असे रेयांश याने आपल्या मनोगतात आवर्जून सांगितले.
जिल्ह्यातून घडलेल्या अन्य खेळाडूपेक्षा रेयांशने वेगळेपण जपले आहे तो नक्कीच यशोशिखर गाठेल असे प्रतिपादन जनता दल पक्षाचे जिल्हाध्यक्ष युयुस्तु आर्ते यांनी केली. भविष्यात रेयांशाला मेडल ठेवण्यासाठी स्वतंत्र मोठे घर बांधावे लागेल एवढा त्याचा अनेक वेळा सन्मान झाला आहे असे अशोक मोहिरे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले. रेयांश पुढील काळात देशपातळीवर खेळेल आणि आपल्या देवरुखचे नाव देशात उंचावेल अशा शब्दात सनगरे यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रीय शिक्षण संस्था भांडुपचे संस्थापक बाळकृष्ण बने,डॉ.सुभाष बने,पराग विद्यालयाच्या संचालीका सुचिता बने,वनिता बने राधा बने,अनिल मोहीरे, राजेंद्र सावंत,अजय सावंत,आत्माराम बने,संतोष सावंत,अशोक मोहीरे,शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुरेश बने, जि.प माजी अध्यक्ष रोहन बने, पराग विद्यालयाचे संचालक पराग बने,घाटकोपर शिवसेना विभाग प्रमुख नंदु आंबवकर,माजी शिक्षण अधिकारी अशोक मोहिरे,सोनवीनदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.सनगले, कुंडी गावचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सदानंद बने,सरपंच दिलीप लोकम, संदेश धाग, डोंबिवली शिवसेना विभाग प्रमुख विवेक खामकर,डॉ.समीर बने,सुबोध पेडणेकर, स्कूलच्या मुख्याध्यापिका स्पृथा बने.कुंडी गावचे पोलिस पाटील धीरज मांजरेकर, हरिश्चंद्र सावंत, मनोहर लोकम,काशिनाथ चव्हाण, प्रकाश धावडे,राजू पवार,योगेश शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महेंद्र नांदळस्कार,अशोक मोहिरे,प्रभाकर सनगरे,अनिल नांदळस्कर,नंदकिशोर आंबवकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून रेयांशा आणि तेजल बने यांना शुभेच्छा दिल्या.