सर्वसामान्य सेवानिवृत्त शिक्षकांनी मानले
जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे आभार
लांजा (प्रतिनिधी) संपूर्ण जिल्ह्यातील सर्वसामान्य
जि.प. सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षिकांची अनेक कामे ही केवळ जि.प. सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष बांडागळे गुरुजी व त्यांचे सर्व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांच्यामुळे मार्गी लागल्याने
सर्वसामान्य सेवानिवृत्त शिक्षकांतून त्यांचे आभार मानले जात आहेत.
संघटना अस्तित्वात आल्यापासून सर्व सामान्य सेवानिवृत्त शिक्षक- शिक्षिकांचे किती तरी विषय हाताळत आहे. वेळेवर पेन्शन मिळणे असो किंवा उपादान, अंशराशिकरण, गटविमा, अंतिम फंड प्रस्ताव, काही सेवेतील प्रदीर्घ येणे, निवड श्रेणी, ३० जून सेवा निवृत्त एक वेतन वाढ असो एम एस सी आय टी परतावा, सातव्या वेतन आयोगाचे थकलेले हप्ते मिळणेसाठी प्रयत्न केले आहेत. वेळप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा, सततच्या गाठी भेटी . पत्रव्यवहार करून अनेक कामे प्रशासनाकडून करण्यास भाग पाडले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही सेवानिवृत्ताकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व त्यांची कार्यकारणी काम करत आहे .
संगणक ( MSCIT) वसुली परत मिळवून देणे बाबतचा संघटना स्तरावचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. गेल्या दोन महिन्याखाली लाखो रुपये संगणक वसुली सेवानिवृतांच्या खात्यावर जमा झाली. अन्य ही शिक्षकांचे सदरची रक्कम मिळवून देण्यासाठीचे प्रक्रिया पार पडण्याचे महत्त्वाचे काम सध्या जिल्हाध्यक्ष श्री.बांडागळे आणि त्यांचे सर्व सहकारी करीत आहेत .
दरम्यान , राज्य संघटनेने राज्याचा व्हाटस अॅपचा ग्रुप तयार करून त्यावर सर्व जिल्ह्याचे, तालुक्याचे पदाधिकारी यांना सदर ग्रुपवर सामावून घ्यावे, जेणेकरून तळागाळातील काम वरपर्यंत आणि राज्य पातळी वरील काम तालुक्या पर्यंत पोहोचेल व त्यामुळे संघटना बळकट होण्यास मदत होईल, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षिकांतून केली जात आहे












