विजयदुर्ग तंटामुक्ती अध्यक्षपदी दशरथ तळेकर यांची बिनविरोध निवड 

विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) : विजयदुर्ग गाव तंटामुक्ती अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते दशरथ तळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तळेकर यांनी यापूर्वी पुरळ विभागीय भाजपा उपाध्यक्ष म्हणून उत्तम काम केलं असून गोपाळकृष्णवाडी तसेच विजयदुर्गमधील अन्य भागातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. या कामाची पोचपावती म्हणून विजयदुर्गमधील ग्रामस्थांनी दशरथ तळेकर यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड केली. याबद्दल सरपंच रियाज काजी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा माजी सरपंच प्रसाद देवधर, पडेल मंडल भाजपा महिलाध्यक्षा सुप्रिया आळवे, पडेल मंडल भाजप सचिव प्रदीप साखरकर, माजी पं. स. सदस्या शुभा कदम, ग्रेसिस फर्नांडिस, पोलीस पाटील राकेश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कातिवले आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.