रत्नागिरी | प्रतिनिधी :
तालुक्यातील दांडेआडोम ते कोतवडे जाणार्या रस्त्यावर पादचारी वृध्दाला अज्ञात दुचाकीची धडक बसून अपघात झाला. अपघातातील जखमी वृध्दाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. अपघाताची ही घटाना शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.15 वा.सुमारास घडली.
श्रीकृष्ण सोनू मोरे (65,रा.दांडेआडोम मांडवकरवाडी,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा रविंद्र कृष्णा मोरे (45,रा.दांडेआडोम मांडवकरवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुकवारी सायंकाळी त्यांचे वडिल श्रीकृष्ण मोरे हे दांडेआडोम ते कोतवडे जाणार्या रस्त्याने आपल्या शेतावर जात होते. त्यावेळी अज्ञात दुचाकीची त्यांना धडक बसून हा अपघात झाला. यात श्रीकृष्ण मोरे खाली रस्त्यावर पडल्याने यांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू रात्री 10 वा.मृत्यू झाला.













