मनसेच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी विनोद जानवळकर यांची निवड व्हावी

मनसे कार्यकर्त्यांची मागणी

गुहागर | प्रतिनिधी : 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष पदाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर गुहागर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांची निवड करण्यात यावी अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे.एक सच्चा मनसैनिक, उपतालुका अध्यक्ष गुहागर तालुका अध्यक्ष त्यानंतर गुहागर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र उपजिल्हाध्यक्ष असा मोठा राजकीय प्रवास असलेल्या विनोद जानवळकर यांना ही संधी पक्षाने द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

गुहागर तालुक्यातील जानवळे गावातील रहिवासी असलेले कुठलीही राजकीय कौटूंबिक पार्श्वभूमी नसलेले.. सर्वसामान्य कुटुंबातील परंतु लहानपणापासूनच अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करणारा जनतेसाठी जिथे गरज आहे तिथे संघर्ष करणारा अशी ओळख असलेला निर्भीड व डॅशिंग कार्यकर्ता म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित असलेला एक कार्यकर्ता विनोद गणेश जानवळकर यांचा राजकीय प्रवास आहे. लोटे एमआयडीसीतील कामगारांच्या न्याय हक्कासाठी अनेक कंपनीच्या व्यवस्थापनावर त्यांनी लढा दिला, कामगाराचे अनेक प्रश्न त्यांनी सोडविले होते. २००९ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र सैनिक म्हणून ते अनेक वर्ष काम करत राहिले, त्यांच्या कामाची दखल वरिष्ठांनी घेऊन त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपतालुका अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केली, उपतालुका अध्यक्ष पदावर असताना त्यानी विविध जनहिताची कामे केली, गुहागर तालुक्यात प्रथम राज ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने मनसे रुजवणारा कार्यकर्ता म्हणून आजही त्यांची ओळख आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्ष‌णिक साहित्य वाटप, वृक्षारोपण असे अनेक उपक्रम त्यांनी हाती घेऊन योग्यरीत्या पार पाडली. डिसेबर २०११ते २०२२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेऊनच त्यांना गुहागर तालुका अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांची निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील रस्त्या संदर्भात अनेक गावोगावी जाऊन रस्त्याचे डागडुजी करून घेतली. २०२१ मध्ये आलेल्या चिपळूण महापुरातील अनेक गावांना भेट देऊन पूरग्रस्तांना अन्नधान्य आणि पाणीपुरवठा, कपडे व निवाऱ्याची व्यवस्था केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व कामाचा आढावा घेऊन त्यांना उपजिल्हाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांची पदावर नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या माध्यमातून आणि जनतेचे मूलभूत प्रश्न त्यांनी सोडवले, जनतेच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलने केली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तरुणांचे अनेक प्रश्न सोडवस्त्यानेतर अनेक तरुणांनी महारष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.त्यांचा राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर असतो. गोरगरीब व गरजूना सतत उपयोगी पडणे हे त्यांचे पहिले ध्येय असून यामुळेच येथील युवा वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विनोद जानवळकर यांची जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करावी अशी मागणी सध्या जोरदार होत आहे