शिक्षक दिनाच्या माखजन हायस्कुलमध्ये शुभेच्छा

गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व अ‍ॅड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक दिनानिमित्त पुणे जनता सहकारी बँक,माखजन शाखेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. प्रत्येक वर्षी जनता सहकारी बँकेतर्फे शिक्षक दिनी शुभेच्छा दिल्या जातात.दरम्यान यावेळी शाखा उपव्यवस्थापक धनंजय कात्रे,अक्षय शिंदे,मुख्याध्यापक महादेव परब,ज्येष्ठ शिक्षक गणेश शिंदे, गौरव पोंक्षे आदी उपस्थित होते.