टिळक ग्रंथालयाचे आयोजन
सातार्डा : प्रतिनिधी
येथील टिळक ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पंचक्रोशी मर्यादित भजन स्पर्धेत कवठणी श्रीदेव काजरोबा प्रासादिक भजन मंडळाने प्रथम पारितोषिक पटकावले. श्रीदेवी माऊली भजन मंडळ सातोसे द्वितीय तर श्रीदेवी माऊली भजन मंडळ किनळे मंडळाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : उत्तेजनार्थ श्रीदेव बाळवस भजन मंडळ मुंबार्डे सातार्डा, शिस्तबद्ध संघ श्रीदेव रवळनाथ भजन मंडळ सातार्डा यांना गौरवण्यात आले. उत्कृष्ट गायक प्रदीप कवठणकर, उत्कृष्ट गवळण गायक रामनाथ हळदणकर, उत्कृष्ट पखवाज वादक लक्ष्मण पेडणेकर, उत्कृष्ट संवादिनी वादक अमोल मांजरेकर यांना सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते शंकर कवठणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शर्मिला मांजरेकर, मनोहर मेस्त्री, गोविंद मांजरेकर, कवठणी माजी सरपंच शेखर गावकर, ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर, माजी पं. स. सदस्य श्रुतिका बागकर, सुदन कवठणकर, शांताराम आसोलकर, दत्ता भगत, माजी सरपंच गजानन शिरसाट, शेखर केरकर, भरत मयेकर, सातोसे माजी सरपंच वसंत धुरी , प्रायोजक पृथ्वीराज मांजरेकर,
मंडळाचे उपाध्यक्ष अजित कवठणकर, कार्यवाह धनंजय केरकर, सहकार्यवाह ज्ञानदीप राऊळ, सल्लागार नारायण बागकर, परिक्षक प्रेमनाथ धारगळकर, शांताराम गोवेकर आदी उपस्थित होते.
यावेळी शांताराम आसोलकर, वसंत धुरी, प्रेमनाथ धारगळकर यांनी ग्रंथालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी पंचक्रोशी ग्रंथालयाचे सदस्य पांडुरंग हळदणकर, प्रसाद मांजरेकर, आनंद तानावडे, दीपक मांजरेकर, महेंद्र मांजरेकर, बाबी मेस्त्री, संदेश कवठणकर, ओंकार कवठणकर, सावळाराम शिरोडकर, परशुराम मांजरेकर, प्रभाकर मांजरेकर, गणेश मांजरेकर, नंदकिशोर मांजरेकर, समिधा मांजरेकर, मेघश्याम बागकर, विलास मांजरेकर, संतोष पाटकर, अनंत बागकर, यामेश्वर कवठणकर, अमित कुडतरकर, प्रतीक घुरे, तुळशीदास मयेकर, मकरंद मांजरेकर, योगेश मांजरेकर, अशोक जाधव, उमेश मांजरेकर, अमित पिळणकर, ग्रंथपाल संजय कवठणकर, उत्कर्षा आरोंदेकर, स्नेहल बागकर, रवींद्र कवठणकर व भजनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद मांजरेकर व आभार कार्यवाह धनंजय केरकर यांनी केले.













