स्थानिक स्वराज्य निवडणुका व विकासकामांवर चर्चा
खेड (प्रतिनिधी)– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक तालुकाध्यक्ष श्री. संजय जाधव यांच्या पुढाकाराने खेड येथील पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच गाव, वाड्या आणि वस्त्यांवरील विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजी राव जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती करून लढणार आहे. मात्र युती झाली नाही तरी प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी ठेवावी. तसेच प्रदेशाध्यक्ष मा. खासदार श्री. सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार पक्षवाढीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री. स.तु. कदम, तालुकाध्यक्ष श्री. संजय जाधव, माजी तालुकाध्यक्षा सौ. नम्रता ताई भोसले, युवक जिल्हाध्यक्ष श्री. अजिंक्य (बाळू) आंब्रे, श्री. मुखत्यार भाई कावलेकर, श्री. जलाल भाई राजपूरकर, श्री. मोझम परकार, सौ. जयमाला ताई पाटणे, श्री. शत्रूघ्न मोरे, श्री. उमेश देवरुखकर, श्री. श्रीधर गवळी, श्री. नितीन बळीराम डेरवणकर, श्री. दाऊद अकबर दुदुके, श्री. प्रफुल्ल मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न, विकासाची दिशा आणि आगामी निवडणुकांची रणनीती यावर सकारात्मक चर्चा झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.












