आकांक्षा सप्रे व कीर्ती देवस्थळी यांची विभागस्तरावर ‘कथाकथन ‘या कलाप्रकारात-हनुमान सीता भेट (अशोकवाटिका) या कथेला प्रथम क्रमांक
राज्यस्तरीय कला उत्सवासाठी निवड
देवरुख (प्रतिनिधी) : येथील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विभागस्तर कला उत्सव व कथाकथन स्पर्धेत यश संपादन केले आहे. केंद्र शासनामार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी येथे विभागस्तरीय कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पाच जिल्ह्यातून अनेक शाळा व महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाली होती. सरफरे विद्यालयातील विद्यार्थी दृश्यकला (चित्रकला), कथाकथन या दोन कला प्रकारात सहभाग घेतला होते. दृश्यकला (चित्रकला) कला प्रकारात कु .ओंकार रामाने (१० वी) यांनी सहभाग घेतला होता. कु आकांक्षा योगेश सप्रे (१०वी) व कु कीर्ती प्रसाद देवस्थळी (१० वी) विभागस्तरावर ‘कथाकथन ‘या कलाप्रकारात- हनुमान सीता भेट (अशोकवाटिका ) या कथेला प्रथम क्रमांक पटकावला.
गतवर्षी याच कला उत्सवात कु. आकांक्षा सप्रे हिची राज्यस्तरावर कथाकथन स्पर्धत द्वितीय क्रमांक पटकवला होता. हे दोन्ही विद्यार्थी पूणे येथे होणाऱ्या ‘राज्यस्तरीय कला उत्सवात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या दोन्ही विद्यार्थ्याना प्रशालेचे कलाशिक्षक प्रदिप शिवगण यांचे मार्गदर्शन लाभले. यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष राजाराम गर्दे, उपाध्यक्ष शांताराम भुरवणे, उपाध्यक्ष दिलीप मोरे, सरचिटणीस शरद बाईत, खजिनदार महेश जाधव, सचिव ललितकुमार लोटणकर, सर्व संस्था संचालक, मुख्याध्यापक प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांनी सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.












