बळीराम गुजर, मनोहर मोहितेंसह ग्रामस्थांनी केले अभिनंदन
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुंढे येथील साहिल श्रीराम गायकवाड याने आयटीआय इलेक्ट्रिशियन या दोन वर्षांच्या कोर्समध्ये ६०० पैकी ६०० गुण मिळवून यश संपादन केले आहे. या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण समिती सभापती मनोहर मोहिते, शिवसेना उबाठा चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर आदींनी गायकवाडचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
साहिलचे आईवडील शेतकरी असून काबाडकष्ट करून मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावत आहेत. विशेष म्हणजे साहिलनेदेखील आईवडिलांच्या कष्टाचे या यशातून चीज केल्याचे स्पष्ट झाले आहे. साहिलने मिळवलेल्या या यशाबद्दल गावातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल मुंढे गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी जाधव, माजी सरपंच सुभाष शिर्के, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिपक शिर्के, जेष्ठ शिवसैनिक आमचे मार्गदर्शक गणेश खेतले, रविंद्र खेतले आदींनी साहिलचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. यावेळी श्रीराम गायकवाड व त्यांचे जेष्ठ चिरंजीव कुमार क्षीतीज गायकवाड उपस्थित होते.












