पोईप येथे वेलांकणी मातेचा उत्सव उत्साहात साजरा! 

मसुरे | झुंजार पेडणेकर :  मालवण तालुक्यातील पोईप येथे वेलांकणी चॅपेलमध्ये वेलांकणी मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पोईप येथील ख्रिस्ती बांधवांनी ९ दिवस नोव्हेना व मिस्सा अर्पण केली. यात सर्व समाजासाठी व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना केली.

या सणासाठी प्रमुख मसुरे पॅरिसचे फादर गिल्बर्ट, चिंदर गावचे फादर सॅबी, कट्टा पॅरिसचे फादर थॉमस आणि ओरोस पॅरिसचे फादर डाॅन बाॅस्को स्कूलचे प्रिंसिपल मेलविन उपस्थित होते.

यावेळी फादर मेलविन यांनी मिस्सा बलिदान केले. व उपस्थिताना धार्मिक विषयांवर मार्गदर्शन केले. फादरानी वेलांकणी मातेची मूर्ती घेऊन सर्व ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितित पोईप बाजारपेठेत शांतता फेरी काढली.

या सणासाठी मसुरे, कसाल, चिंदर, व फणसवाडी या गावातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेलाकणी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष निकोलस लोबो यांनी सुत्रसंचलन करुन सर्वांचे आभार मानले.