मसुरे मर्डे विठ्ठल मंदिर येथे हरिनाम सप्ताह!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे मर्डेवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे 11 ते 18 सप्टेंबर या कालावधीत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हरीनाम सप्ताह कालावधीत पंचक्रोशीतील भजन मंडळ आपली भजन सेवा देणार आहेत. तसेच आकर्षक चित्ररथ देखावे, गोफ नृत्य सुद्धा असणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री देव विठ्ठल मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.