शिरगाव हायस्कूलच्या १९८५-८६ च्या बॅचनं शाळा नूतनीकरणासाठी दिली १.५० लाखांची देणगी

शिरगाव (प्रतिनिधी) –     शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सन १९८५-८६ च्या एस.एस.सी. बॅचने शाळेच्या इमारत नूतनीकरणासाठी तब्बल १,५०,०००/- रुपये देणगी देऊन आपल्या शाळेबद्दल अपार कृतज्ञता व्यक्त केली.

हा धनादेश विशेष कार्यक्रमात शाळेच्या कार्यालयात शाळेला प्रदान करण्यात आला.

मुख्याध्यापक एस. एन. आत्तार सर यांनी उपसितांचे स्वागत केले. या वेळी सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, उपाध्यक्ष संभाजी साटम, अधीक्षक संदीप साटम व चेअरमन विजयकुमार कदम यांनी मार्गदर्शन करताना बॅचने दाखवलेले शाळाप्रेम भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

माजी विद्यार्थी शिवराज तावडे व राजेंद्र तावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदैव उपलब्ध राहू तसेच भविष्यातही संस्थेला सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

या अनमोल देणगीमुळे शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून, संस्थेच्या वतीने १९८५-८६ च्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम सर, संस्था कार्यकारिणी सदस्य हेमंत देसाई, अधीक्षक संदीप साटम, कार्यकारिणी सदस्य मिलिंद साटम, सहसचिव पंडित तावडे, तसेच माजी विद्यार्थी विठोबा घाडी, पांडुरंग घाडी, महेश पवार, शिवराज तावडे, राजेंद्र तावडे व विजय घाडी आधी उपस्थित होते