आमदार निलेश राणे यांच्या मध्यमातून हडी पाणखोल जुवा येथील विकासकामे पुर्ण करणार

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा ग्रामस्थांना शब्द ; खारबंधारा सह विविध विकासकामांबत ग्रामस्थानी भेट घेऊन केली चर्चा

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील हडी पाणखोल जुवा येथील ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची बुधवारी भेट घेतली. खारबंधारा, स्मशान शेड, हडी मुख्य मार्गांवरून वरून येणारा रस्ता यांसह विविध विकास कामांवर चर्चा केली. दरम्यान, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाशील असल्याची ग्वाही दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना दिली.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, संधटक राजू बिडये, कोषाध्यक्ष आबा शिर्सेकर, मनोज हडकर यांसह पाणखोल जुवा येथील ग्रामस्थ संतोष मिठबावकर, शैलेश पाटकर, हेमंत गोलतकर, आनंद गोलतकर, जितेंद्र शेटये, स्वप्नील गोलतकर, ओंकार गोलतकर, नवनाथ गोलतकर, चंद्रहास मिठबावकर, प्रवीण मुणगेकर, आदिनाथ आपकर, गणेश शेटये, संजय मिठबावकर, यशवंत मिठबावकर, जगदीश गोलतकर, प्रशांत धुरी, आनंद गोलतकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.