प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: ‘अमर रहे अमर रहे, विजय कराडे अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये नागाव (ता. करवीर) येथील जवान विजय विलास कराडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.पंजाबमधील चंदी मंदिर येथील रेजिमेंट येथे शनिवारी कर्तव्य बजावत असताना अपघात होऊन कराडे गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला होता. पुण्याहून आज सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव गावी आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी पार्थिव घरी आणताच आई-वडील, भाऊ, आजी-आजोबा आणि नातेवाइकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.गावातील सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूने रांगोळी काढून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून टाळ-मृदंगाच्या गजरात गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेदरम्यान उपस्थित सर्वांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून पुष्पवृष्टी केली. गावातील शाळेच्या पटांगणावर लहान भाऊ अजयने पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी लष्कराच्या १०९ मराठा बटालियनच्या वतीने मानवंदना देण्यात आली. प्रशिक्षक व अंत्ययात्रेत भागातील सामाजिक, सांस्कृतीक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर व गावातील नागरिक तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक उपस्थित होते. ग्रामपंचायत, तरुण मंडळे यांनी केवळ आठ महिनेच राहिला होता सेवा कालावधीविजय हे अग्निवीरमधून भरती झाले होते. आठ महिन्यांनंतर त्यांचा सेवा कालावधी संपणार होता. त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.












