गौरव पोंक्षे| माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिली तर धामापूर गावच अव्वल ठरेल असा विश्वास बहुजन विकास आघाडी चे जिल्हा अध्यक्ष सुरेश भायजे यांनी व्यक्त केला.
९९% गुण मिळवणारी याच गावातील मुलगी कु.आर्या पडे व एमपीएससी परीक्षेत आठराव्या रँक ने उत्तीर्ण होणारे श्री.रोहन शिगवण देखील याच गावातील असल्याचे नमूद केले.ते उत्कर्ष तरुण मंडळ धनावडे वाडी आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, धामापूर तर्फे संगमेश्वर हा सहा हजार लोकवस्तीचा गाव आहे. या गावात २००५ ला माजी सरपंच कै.परशुराम उर्फ भाऊ शिगवण व सामाजिक कार्यकर्ते कै.गणपत भायजे यांनी कुणबी समाजाचा शैक्षणिक , नोकरी विषयक प्रत्येक कुटुंबात जाऊन सर्वे केला असता गावात कुणबी समाजाचा एकही शासकीय कर्मचारी सापडला नाही, बारावी येथे शिकणारे बोटावर मोजण्या एवढीच मुलं होती,मात्र पदवीधर एकही मूल कुणबी समाजात सापडल नाही. आज तब्बल वीस वर्षानंतर गावात शेकडो मुलं पदवीधर झालेली आहेत, याच गावातील भडवळेवाडीचा सुपुत्र श्री. रोहन सखाराम शिगवण यांनी पुणे येथे जॉब करता करता एमपीएससी परीक्षेत ते अठराव्या रँक ने उत्तीर्ण झाले आहेत. याच गावातील पडये वाडीतील कु. आर्या दिनेश पडे हिने सात किलोमीटर वर असणाऱ्या माखजन हायस्कूल येथे जात,येत प्रसंगी पायपीट करत,कोणताही क्लास न घेता केवळ शालेय अभ्यासक्र करत एस.एस.सी ला ९९% मार्क मिळवले आहेत. आज ८० टक्के हून अधिक मार्क घेणाऱ्या दहावी, बारावी व पदवीधर अशा अनेक मुलांचा सत्कार आपण करतो आहोत. गुणवंत मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे पवित्र कार्य उत्कर्ष तरुण मंडळ धनावडे वाडी अनेक वर्षे करत आहे. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा आदर्श कुणबी समाजातील सर्व मंडळानी घेणे आवश्यक असल्याचे मत श्री.सुरेश भायजे यांनी व्यक्त केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये श्री.रोहन शिगवण, कु. आर्या पडये, प्रथमेश प्रकाश धनावडे एमबीए ९०% , रोहन रामचंद्र धनावडे(होमगार्ड), कु. सायली सुरेश साळवी, अनिकेत यशवंत धनावडे, बीएससी कॉम्प्युटर. समीर सुनील धनावडे, बीएससी आयटी.
बारावी परीक्षेमध्ये आर्यन अनंत धनावडे ८७%, सई तानाजी धनावडे ८६. ५०%, मनस्वी विजय धनावडे ८४%, वैष्णवी सुभाष धनावडे ६९% , साक्षी महेंद्र धनावडे ,सिद्धीका रमेश धनावडे, संकेत संतोष धनावडे, आकांक्षा विजय धनावडे, स्नेहल राजेश धनावडे, अजिंक्य अशोक धनावडे, लावण्या मंगेश धनावडे, सुशील सिताराम धनावडे, श्रवण संतोष रामाने ,स्वस्तिक संतोष धनावडे, मयुरी एकनाथ भायजे ,प्रणिता सुरेश धनावडे, यश गणपत धनावडे ,संजना गणेश गवतडे ,धनश्री सुरेश धनावडे या विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ भेट व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
शिक्षणाशिवाय समाजाची उन्नती नाही म्हणून शैक्षणिक बाबतीत जे जे विद्यार्थी भरारी घेतील त्यांचा आम्ही कायमस्वरूपी असाच सत्कार करू , म्हणून मुलांनी जास्तीत जास्त गुणवत्ता मिळवावी असा आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रभाकर धनावडे यांनी केले.
विद्यार्थी गुणगौरवा नंतर शक्ती तुऱ्याचा जंगी सामना ठेवण्यात आला होता. शक्तीवाले शाहीर किशोर धनावडे ,सुनील धनावडे सह दीपक बा धनावडे, सिताराम धनावडे, महेंद्र धनावडे वाघजाई देवी नृत्य कला पथक धनावडेवाडी विरुद्ध तुरेवाले शाहीर रमेश वीर, सोमेश्वर नाच मंडळ कळंबट तालुका चिपळूण. यांचा जंगी सामना हजारो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. शाहीर किशोर धनावडे यांच्या सुरेल अशा विविध गाण्यानी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.













