आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेच्या रंगकामासाठी दिली ५०००/-रुपयां ची देणगी 

जि.प.प्रा.शाळा भांबेड नं.१ ची विद्यार्थिनी कु. गार्गी कुळये हिची शाळेप्रती आपुलकी 

संतोष कोत्रे | लांजा-: लहान वयातच मुलांवर संस्कार केले तर त्यांची समाज, शाळा व सर्वांच्या बाबतीत आपुलकीची, दातृत्वाची भावना निर्माण होते.‌भांबेड शाळा नं.१ ची विद्यार्थिनी कु. गार्गी कुळये हिने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेच्या रंगकामासाठी ५ हजार रुपयांची देणगी देत खर्ऱ्या अर्थाने आपली शाळेप्रती असलेली आपुलकी दाखवून दिली आहे.

तालुक्यातील भांबेड येथील जि.प.प्रा.शाळा भांबेड नं.१ मध्ये इयत्ता पहिली मध्ये शिकणारी गार्गी गणेश कुळये हिने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी

आपल्या शाळेच्या रंगकामा साठी ५०००-रुपये ची देणगी दिली आहे. एवढ्या लहान वयात शाळेप्रती दाखवलेली आपुलकी जाणीव हे खरोखरच कौतुकास्पद आहे

कु.गार्गी व तिच्यावर उत्तम संस्कार करणारे आजोबा, तिचे वडील श्री.गणेश कुळये (भांबेड हायस्कुलचे शिक्षक)व आई यांनी दाखवलेली ही दानशूर वृत्ती इतर विद्यार्थ्यांसाठी व पालकांना प्रेरणादायी आहे. छोट्या वयातही शैक्षणिक जाणीव ठेवून शाळेच्या विकासात हातभार लावणे ही मोठी गोष्ट आहे.

शाळेच्या रंगकामामुळे आपली शाळा अधिक सुंदर होईल. या उपक्रमामध्ये गार्गीने दिलेली मदत अमूल्य ठरणार आहे. या देणगी बद्दल

गार्गीसह तीचे आई-वडील, आजी आजोबा यांचेही शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे