गोळवण शाळा नं.१ चा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न!

मसुरे | झुंजार पेडणेकर  जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गोळवण नं.१ येथे माजी विद्यार्थी मेळावा श्री. साबाजी देविदास गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मेळाव्या मध्ये शालेय गरजा, शैक्षणिक गुणवत्ता वाढ यावर चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापक श्री संतोष पाताडे यांनी शालेय गरजा, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळेत सुरूअसलेले उपक्रम याबाबतच्या उल्लेखनीय बाबींची माहिती दिली व मेळाव्याच्या आयोजना मागील उद्देश विशद केला. यावेळी बोलताना सरपंच सुभाष लाड यानी लोक सहभाग व ग्रामपंचायतच्या माध्यमातून शालेय गरजा व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. माजी विद्यार्थ्यांमधून श्री. भाई चिरमुले व बाळकृष्ण खरात यांनी बालपणच्या आठवणींना उजाळा दिला व शालेय सुविधा उपलब्ध करून देण्यास सहकार्य करू अशी ग्वाही दिली. अध्यक्ष मनोगतात साबाजी गावडे यानी शाळेने आपलं उज्वल भवितव्य घडविलेले असून तिच्या ऋणातून उत्तरदायित्व होण्यासाठी सध्या आपल्या शाळेच्या असलेल्या शालेय गरजा व भौतिक सुविधा निर्माण करून देणे आपली जबाबदारी आहे सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास परब, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रवीण शिवलकर, उपसरपंच शरद मांजरेकर माजी विद्यार्थी भाई चिरमुले, बाळकृष्ण खरात, सत्यवान पालव, विनायक गावडे, शरद परब, प्राची नाईक, नंदू नाईक, बाबुराव चिरमुले, सागर जाधव, सत्यवान परब, नारायण परब पोलीस पाटील अमित आंगचेकर ,सर्व ग्रामपंचायत सदस्य शिक्षक, यांच्यासह 110 माजी विद्यार्थी उपस्थित होते.