वेंगुर्ले तालुका वकिल संघटना अध्यक्ष पदी ॲड. श्रीकृष्ण ओगले यांची निवड…

उपाध्यक्ष ॲड. प्रकाश बोवलेकर व सचिव ॲड. सागर ठाकुर

नूतन कार्यकारणी जाहीर

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुका वकिल संघटनेची तीन वर्षाची कार्यकारणी संघटनेच्या वार्षिक सभेत निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून ॲड. श्रीकृष्ण ओगले यांची उपाध्यक्ष म्हणून ॲड. प्रकाश बोवलेकर यांची व सचिव पदी ॲड. सागर ठाकुर यांची निवड करण्यात आली आहे.

वेंगुर्ले तालुका वकिल संघटनेची कार्यकारणी में २०२८ ते एप्रिल २०२९ या कालावधीसाठी निवडण्यात आली. यामध्ये सहसचिव म्हणून ॲड. श्रध्दा बावीस्कर, खजिनदार म्हणून ॲड. पूनम नाईक त्याचप्रमाणे कार्यकारणी सदस्य म्हणून ॲड. मनीष सातार्डेकर व ॲड. आरती गावडे यांची निवड एकमताने करण्यात आली. यावेळी ॲड. श्री.एन.जे. गोडकर, ॲड. श्री.जी. जी. टाकंकर, ॲड. श्रीमती सुषमा प्रभूखानोलकर, ॲड. श्री सूर्यकांत प्रभूखानोलकर, ॲड. श्रीमती. तेजश्री कांबळी, ॲड. श्री. धनंजय झाट्ये, ॲड. श्रीमती वैदेही नरसुले, ॲड. श्री. नामदेव मठकर, ॲड. श्रीमती शुभदा सातोस्कर, ॲड. श्रीमती हर्षदा कुडव, ॲड. श्रीमती शुभांगी सडवेलकर, ॲड. भावना पोखरे उपस्थित होते. नूतन कार्यकारणीचे सर्वांनी अभिनंदन केले.