सावंतवाडी : सावंतवाडी लाखेवस्ती येथील युवा कार्यकर्ते परशुराम चलवाडी, निलिमा चलवाडी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, प्रसाद अरविंदेकर, केतन आजगावकर, अमेय पै आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.









