भाजपा रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष श्री अशोक वाडेकर यांच्या तत्परतेने डागडुजीच्या कामाला तातडीने सुरुवात
रत्नागिरी : मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ८ मधील मच्छिमार्केट समोरील तटबंदी ढासळून आजूबाजूच्या गाळे धारकांना याचा धोका निर्माण झाला होता.संबधित व्यवसायिकांनी हा विषय भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष श्री अशोक वाडेकर यांच्यासमोर मांडला.श्री वाडेकर यांनी तत्परता दाखवत नगर परिषद प्रशासनाशी संवाद करून तातडीने प्राथमिक काम सुरू करा अशी मागणी केली.याची दखल घेऊन आज नगर परिषदेने कामगार पाठवले.श्री अशोक वाडेकर यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करून घेतले.या कामाविषयी गाळे धारकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.












