कातर आळीतील ‘त्या’ कुटुंबाला लायन्स क्लब खेड सिटीची मदत

खेड | प्रतिनिधी – दि. १४ सप्टेंबर रोजी खेड शहरातील कातर आळी परिसरात १२ सप्टेंबर रोजी पहाटे २.१५ वाजता लागलेल्या आगीत एका कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. किशोर चंद्रकांत विचारे यांच्या घरातील फ्रीजला अचानक आग लागली आणि ती झपाट्याने पसरत किचनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेनंतर समाजातील कार्यकर्त्यांनी तत्परतेने मदतीचा हात पुढे केला. अपघातग्रस्त व निराधारांना तातडीने आधार देण्याच्या परंपरेनुसार लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने आज दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी या कुटुंबाला मदत करण्यात आली. मोरे फर्निचरचे मालक संदीप मोरे यांच्या वतीने गरजेचे जिन्नस भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब खेड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, डॉक्टर मरकड, संदीप मोरे, राजेश जोयसर, शरद शिर्के, आबा निकम, सागर चिखले, डॉक्टर वेद तलाठी, शंकर पार्टे, शैलेश धारिया यांसह क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.
लायन्स क्लब खेड सिटीने अशा आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतल्याने स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.