प्रदेश कार्यालयाकडे अहवाल पाठवून देणार;महायुती बाबत निर्णय राज्यात होईल
कणकवली :राज्यात निवडणुकांचे सत्र सुरु झाले आहे.नगरपंचायत ,नगरपरिषद आता निवडणुका होत आहेत. निवडणूक प्रमुख म्हणून माझी निवड झाली आहे. निवडणूक समिती प्रमुख आणि प्रभारी पालकमंत्री नितेश राणे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी ,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,बँक अध्यक्ष मनीष दळवी या कमिटीने काल दिवसभर चार नगरपरिषद मध्ये ३५० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असल्याची माहिती भाजपचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले.
कणकवली येथे प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर ,माजी सरपंच बबलू सावंत,शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये ,संतोष पुजारे, ॲड.अभिजीत सावंत,सदा चव्हाण आदी उपस्थित होते.
कणकवलीत नगरपंचायत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर ओरोस येथील जिल्हा भाजप कार्यालयात मालवण,सावंतवाडी,वेंगुर्ले येथील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.चार ठिकाणच्या 77 नगरसेवक आणि 4 नगराध्यक्ष पदासाठी भाजपमधील इच्छुक असलेल्या 350 लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. रात्री 11 वाजेपर्यंत मुलाखती चालल्या होत्या. या सगळ्याच्या मुलाखती घेतल्यानंतर आम्ही राज्य प्रदेश अध्यक्षांकडे अहवाल सादर करणार आहोत.१४ नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल,असे प्रमोद जठार यांनी सांगितले.
भाजपा जिल्हा कार्यालयात आ.दीपक केसरकर आले होते. सर्व नेत्याची महायुती झाली पाहिजे,असे म्हणणे आहे.कार्यकर्त्याची इच्छा आहे,मैत्रीपूर्ण निवडणूक व्हावी,अशी भूमिका आहे.हा निर्णय राज्यात निर्णय होईल.आम्हाला लढण्याची संधी द्या,अशी सर्वांची भूमिका आहे.मुलाखतीला सर्वाची आहे,निवडणूक मैत्रीपूर्ण व्हावी,अशी भूमिका आहे.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खा.नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे अंतिम निर्णय घेणार आहेत. परंतु मित्रपक्ष रत्नागिरीत वेगळी भूमिका का? घेत आहे.राजापूर,लांजा,चिपळूण,रत्नागिरी या ठिकाणी मित्रपक्ष वेगळी भूमिका का घेतात? अशी विचारणा संघटन मंत्री श्री .दळवी यांनी केली . मंत्री नितेश राणे यांनी जागा वाटप व्यवस्थित झाले तर युती होईल. याबाबत या.केसरकर यांनी वरिष्ठ नेत्यांकडे हा विषय मांडला जाईल असे श्री.जठार यांनी सांगितले.
भाजपात वाद नाही तर संवाद आहे.350 लोकांच्या मुलाखती भाजपाने घेतल्या आहेत.तात्विक मतभेद असू शकतात.पण मतभेद नाही.हा निर्णय चांगला होईल. युती ही निवडणुकी पुरती असते. पक्ष वेगळे आहेत,त्यामुळे पक्ष वाढवणे आवश्यक आहेत. पक्ष युतीमध्ये चालत नाही तर निवडणुकांमध्ये चर्चा होते.पक्ष वाढविण्यासाठी निवडणुका महत्वाच्या असतात.पक्षाध्यक्ष यांचे निर्देश योग्य आहे.कारण पक्ष वाढवण्यासाठी ही संधी आहे,असेही जठार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील युतीबाबत निर्णय राज्यात होईल,आमचा अहवाल जाणार आहे.प्रत्येकाला निवडणूक लढवायची आहे.ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे.मी मित्र पक्षांना सांगतो,सर्वांनी पालकमंत्री नितेश राणे यांना भेटा, अजूनही संधी आहे, असे आवाहन महायुतीच्या नेत्यांना प्रमोद जठार यांनी केले.













