चिपळूण (प्रतिनिधी) : सावर्डे कला व विज्ञान महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोनच्या टेबल टेनिस मुले व मुली स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी महेशजी महाडिक यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्राचार्य सुनीतकमार पाटील व प्राचार्य उमेश लकेश्री यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. तानाजी कांबळे यांनी केले. ही स्पर्धा कोकण झोन रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- मुले- प्रथम क्रमांक फिनोलेक्स अकॅडमी रत्नागिरी, द्वितीय क्रमांक घरडा इन्स्टिट्यूट लवेल, तृतीय क्रमांक गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी सावर्डे. मुलींमध्ये प्रथम क्रमांक गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी, द्वितीय क्रमांक डीबीजे महाविद्यालय चिपळूण, तृतीय क्रमांक गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी सावर्डे. यातून कोकण विभागाच्या संघामध्ये निवड झालेले विद्यार्थी. मुले- जय राठोड, देवांग कोरगावकर व वेदांत हळदणकर (फिनोलेक्स अकॅडमी रत्नागिरी), पार्थ शिंदे व सर्वेश चव्हाण (घरडा इन्स्टिट्यूट लवेल). मुली- अपेक्षा राठोड व स्नेहा कदम ( गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी), पावणी मालनकर (एस आर एम कुडाळ), श्रावणी मोरे व वैष्णवी शर्मा डीबीजे महाविद्यालय चिपळूण.
यावेळी कोकण विभागाचे सहसचिव व निवड समितीचे अध्यक्ष शशांक उपशेट्टे, सदस्य, रामचंद्र कदम उपस्थित होते. कार्यक्रमाला आ. शेखर निकम यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. संकेत करणे व प्रा. सुशील सावंत यांनी पार पाडले.












