महावितरणने जनतेला स्मार्ट मीटर जबरदस्ती केल्यास आम्हाला भुमिका घ्यावी लागेल : भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा इशारा
मालवण ::शासनाचा स्पष्ट आदेश हा कस्टमर चा स्वतःचा अर्ज असल्याशिवाय कुठेही (शासकीय कार्यालये सोडून) स्मार्ट मिटर बसवू नका असे असताना सबंधित काही अधिकारी हे मनमानी करत असल्याच्या तक्रारी आहेत. अधिकारी असे करत असतील तर नाविलाजाणे आम्हाला भूमिका घावी लागेल. कारण शासनाची प्रतिमा खराब करण्यासाठीच काही यंत्रणा मुद्दामहून अशा गोष्टी करत आहेत त्यामुळे जिथे जिथे सर्व सामान्य जनतेला त्रास असणार तिथे भाजपा जनतेच्या बाजूने असणार. शासन आणि प्रशासन हा जसा फरक आहे तसा सरकार आणि पक्ष हा फरक सर्वसामान्यांसाठी कायम असणार. काही शासकीय यंत्रणेत बसलेले लोक सरकार आणि आमदार खासदार पालकमंत्री यांना बदनाम करण्यासाठी कामे करत आहेत त्या सगळ्यांची जंत्री पालकमंत्री नितेश राणे यांचे जवळ लवकरच देणार असे भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले.










