शहर भाजपतर्फे भटवाडी येथे अभियानाचा शुभारंभ
सावंतवाडी । प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी शहर भाजपने भटवाडी येथील विठ्ठल मंदिर आणि दत्त मंदिर परिसरात ‘स्वच्छता अभियाना’ ची सुरुवात केली. या उपक्रमाचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानात भटवाडी परिसरातील मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. या प्रसंगी बोलताना लखमराजे भोंसले यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी भाजपचे जिल्हा कार्यकारीणी सदस्य माजी नगरसेवक मनोज नाईक, भाजप शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, शहर सरचिटणीस दिलीप भालेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रसाद अरविंदेकर, जिल्हा सदस्या मिसबा शेख, केतन आजगावकर, संयोजक साईनाथ जामदार, सहसंयोजक मेघना साळगावकर, बूथ अध्यक्ष रवी नाईक, बंड्या केरकर, नीलम जोशी, सीमा नाईक, शशी अळवणी, समिधा नाईक, गीता रेगर, समीक्षा खोचरे, गुरुप्रसाद तेजम, दत्ता हनूसवाडकर, माजी मुख्याध्यापक भरत गावडे, कुणाल सावंत, गोट्या वाडकर उपस्थित होते.
याशिवाय, वि.स.खांडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम पवार, कोळी सर, धुमाळे सर, परिट सर, जि.प. शाळा नंबर ६ चे मुख्याध्यापक केशव जाधव सर, पुरंदेश्वरी कपाटी, रंजन लाखे यांच्यासह भटवाडीतील नागरिक आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या अभियानाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.









