देवगड जामसांडे नगरपंचायतीसाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी घसघशीत पाच कोटी 65 लाख निधी मंजूर केला आहे. या मंजूर निधीमुळे देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विकास कामे मोठ्या प्रमाणात होणार आहेत . देवगड जामसांडे नगरपंचायतीचे भाजपाचे गटनेते शरद ठुकरुल यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
विकास कामे पुढीलप्रमाणे
देवगड तालुका – कामांची एकत्रित यादी ४० कामे
देवगड-जामसंडे नगरपंचायत कामांची यादी
१. प्रभाग क्र. ८ मधील पेडणेकर घर ते नलावडे बिल्डिंगकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, ता. देवगड — बारा लाख रुपये
२. प्रभाग क्र. ८ मधील घेवारी घर ते लोके बिल्डिंगकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, ता. देवगड — तेरा लाख रुपये
३. देवगड-जामसंडे टिळकनगर संजय पेडणेकर घर ते शाम कांबळी घर नवीन रस्ता तयार करणे, ता. देवगड — दहा लाख रुपये
४. अरुण भडसाळे ते बबन धुरी यांच्या घरापर्यंत संरक्षक भिंत बांधणे, ता. देवगड — दहा लाख रुपये
५. ग्रा.मा.क्र.१७६ पासून जामसंडे कानखलवाडी ते ग्रा.मा.क्र.१७७ ला मिळणारा मार्ग, पराडकर घराजवळ संरक्षक भिंत बांधणे, ता. देवगड — वीस लाख रुपये
६. तरवाडी पिंपळपार ते पिरवाडी चव्हाटेश्वर मंदिर रस्त्याचे डांबरीकरण व नुतनीकरण करणे, ता. देवगड — तीस लाख रुपये
७. प्रभाग क्र. १९ वातकर घर ते दिलीप मेस्त्री घर बंदिस्त गटार बांधणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये
८. सनये घर ते लोके घर येथे बंदिस्त गटार बांधणे, ता. देवगड — सहा लाख रुपये
९. देवगड बसस्टँड येथे सोलार हायमास्ट बसविणे, ता. देवगड — तीन लाख रुपये
१०. प्रभाग क्र. ११ मध्ये आवश्यक त्या ठिकाणी सोलार लाईट बसविणे, ता. देवगड — सहा लाख रुपये
११. प्रभाग क्र. १७ तारामुंबरी, मुरमणेवाडी, जोशी घरालगत संरक्षक भिंत बांधणे, ता. देवगड — दहा लाख रुपये
१२. उपरकर घर रस्ता ते मेस्त्री घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. देवगड — दहा लाख रुपये
१३. मेनरोड, हॉटेल रामाणे ते उपनिबंधक कार्यालयापर्यंत गटार बांधणे, ता. देवगड — दहा लाख रुपये
१४. प्रभाग क्र. ८ मधील संजय पराडकर घर ते बी.एस.एन.एल. ऑफिसकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, ता. देवगड — तीस लाख रुपये
१५. प्रभाग क्र. ७ मधील जामसंडे सहकारनगर येथे गार्डन तयार करणे, ता. देवगड — वीस लाख रुपये
१६. किल्ला मराठी शाळा ग्रा.मा.क्र. १४१ ते राजा निकम घर रस्ता (सिमेंट रस्ता), ता. देवगड — तीस लाख रुपये
१७. प्रभाकर कोयघाडी घर ते मुख्य पायवाट चिरेबंदी बांधणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये
१८. जामसंडे खाकशी तिठा ते देवतारी निवास पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये
१९. प्रभाग क्र. १४ धोपटेवाडी टापू येथे सुहास बावकर घराशेजारी विंधन विहीर करून लघुनळ योजना करणे, ता. देवगड — दहा लाख रुपये
२०. प्रभाग क्र. १४ धोपटेवाडी विजय धोपटे घराशेजारी विहीर खोदणे व बांधकाम करणे, ता. देवगड — वीस लाख रुपये
२१. समर्थनगर येथे रामदास भुजबळ ते रविंद्र भुजबळ घरापर्यंत पायवाट काँक्रिटीकरण करणे, ता. देवगड — दहा लाख रुपये
२२. विष्णुनगर येथे मोरे घर ते मांडवकर घर पायवाट काँक्रिटीकरण करणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये
२३. विष्णुनगर मुख्य रस्ता ते सुभाष भडसाळे घर पायवाट काँक्रिटीकरण करणे, ता. देवगड — पाच लाख रुपये
२४. भटवाडी रोड, आदर्श शाळा ते आचरेकर घरापर्यंत गटारावर स्लॅब टाकणे, ता. देवगड — बारा लाख रुपये
२५. प्रबुद्धनगर, आंबेडकर भवन ते अनिल जामसंडेकर घर बंदिस्त गटारावर पेवर ब्लॉक बसवणे, ता. देवगड — दहा लाख रुपये
२६. प्रबुद्धनगर येथे सार्वजनिक विहीरीवर पत्राशेड बांधणे, ता. देवगड — दोन लाख रुपये
२७. प्रबुद्धनगर येथे दोन मोठे सोलार हायमास्ट लावणे, ता. देवगड — सहा लाख रुपये
२८. टिळकनगर माने घर ते जामसंडे बाजारपेठकडे नवीन रस्ता तयार करणे, ता. देवगड — पाच लाख रुपये
२९. ग्रामक्र.१७८ वेळवाडी ते कावलेवाडी मार्ग क्र.१६३ रस्त्यालगत डांबरीकरण नुतनीकरण करणे, ता. देवगड — पाच लाख रुपये
३०. टिळकनगर परशुराम लाड घर ते पवार घर अंतर्गत वसाहतीतील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. देवगड — वीस लाख रुपये
३१. वेळवाडी संतोष तेली घर ते राजन तेली घर पायवाट सिमेंट काँक्रिटीकरण करणे, ता. देवगड — दहा लाख रुपये
३२. प्रभाग क्र. ९ उल्हास जगताप घर ते बांदिवडेकर आईस फॅक्टरीपर्यंत संरक्षक भिंत बांधणे, ता. देवगड — तीस लाख रुपये
३३. प्रभाग क्र. ९ संतोष जगताप घराशेजारी संरक्षक भिंत बांधणे, ता. देवगड — पंचवीस लाख रुपये
३४. वेळवाडी संतोष तेली घर ते शिवप्रसाद पेडणेकर घर पायवाट सिमेंट काँक्रिटीकरण करणे (भाग २), ता. देवगड — पाच लाख रुपये
३५. वेळवाडी भरत मयेकर घर ते मालवणकर घर ते राजू काळे घर पायवाट सिमेंट काँक्रिटीकरण करणे (भाग १), ता. देवगड — दहा लाख रुपये
३६. जामसंडे पळशी स्मशानभूमी नुतनीकरण करणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये
३७. भटवाडी सांगळे घर ते वहाळापर्यंत बंदिस्त गटार बांधणे, ता. देवगड — पंचवीस लाख रुपये
३८. भटवाडी सावंत घर ते वहाळापर्यंत जाणारे गटार बंदिस्त करणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये
३९. प्रभाग क्र. ११ कुलकर्णी घराजवळ, देवगड बीचकडे जाणाऱ्या रस्त्यावर संरक्षण भिंत बांधणे, ता. देवगड — तीस लाख रुपये
४०. प्रभाग क्र. २ आझादनगर गार्डन ते बांदकर घरापर्यंत नवीन रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. देवगड — पंधरा लाख रुपये












